Google One अतिरिक्त सेवा अटी

शेवटचे फेरबदल केले: ११ नोव्हेंबर, २०२५ |

Google One वापरण्यासाठी, तुम्ही (१)Google सेवा अटी आणि (२) या Google One अतिरिक्त सेवा अटी (“अतिरिक्त अटी”) स्वीकारणे आवश्यक आहे. या अतिरिक्त अटींमध्ये परिभाषित नसलेल्या अटींचे अर्थ Google सेवा अटींमध्ये दिलेले आहेत.

कृपया हे दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा. एकत्रितपणे, हे दस्तऐवज “अटी” म्हणून ओळखले जातात. ते आमच्या सेवा वापरताना तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करू शकता आणि आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हे निश्चित करतात.

तुमची माहिती अपडेट करणे, व्यवस्थापित करणे, एक्सपोर्ट करणे आणि हटवणे हे तुम्ही कसे करू शकता ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या अटी चा भाग नसले तरीही, तुम्ही आमचे गोपनीयता धोरण वाचावे याकरिता आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.

१. आमची सेवा

Google One हे Gmail, Google Photos आणि Google Drive वर शेअर केलेल्या सशुल्क स्टोरेजसह सदस्यत्व प्लॅन देऊ करते, ज्यामध्ये Google किंवा तृतीय पक्षांद्वारे तुम्हाला दिलेल्या अतिरिक्त फायद्यांसह सदस्यत्व प्लॅनचा समावेश आहे. Google One हे Google ने तयार केलेल्या काही AI वैशिष्ट्यांच्या सशुल्क अ‍ॅक्सेससाठी सदस्यत्व प्लॅन आणि AI क्रेडिटदेखील देऊ करते. तुमचा अतिरिक्त Google किंवा तृतीय पक्षाचा वापर अशा फायद्यांना अथवा सेवांना लागू असलेल्या सेवा अटींद्वारा संचालित केला जातो. काही फायदे सर्व देशांमध्ये उपलब्ध नसू शकतात आणि इतर निर्बंधांच्या अधीन असू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया Google One मदत केंद्र ला भेट द्या.

Google One सेवा तुम्हाला Google सेवा अटी मध्ये नमूद केलेल्या Google संस्थेद्वारे दिली केली जाते. तुम्ही Google One सदस्यत्व किंवा AI क्रेडिट खरेदी करता, तेव्हा तुम्ही विक्रेत्यासोबत एक वेगळा करार करता, जो Google संस्था (विभाग २ पहा) किंवा तृतीय पक्ष असू शकतो. तुमच्याकडे तृतीय पक्ष किंवा सहयोगी कंपनीकडील Google One सदस्यत्व असल्यास, तुमचे सदस्यत्व त्या तृतीय पक्ष किंवा सहयोगी कंपनीकडून अतिरिक्त अटींच्या अधीन असू शकते.

AI क्रेडिट

नियुक्त केलेल्या AI वैशिष्ट्यांमध्ये तुमच्या विनंत्या सुरू करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही AI क्रेडिट वापरू शकता. विशिष्ट कृतीसाठी (उदा. व्हिडिओ जनरेट करणे) आवश्यक असलेली क्रेडिटची संख्या तुम्हाला सुसंबद्ध उत्पादन किंवा वैशिष्‍ट्यामध्ये कळवली जाईल. Google हे AI वैशिष्‍ट्ये वापरण्यासाठीच्या क्रेडिट किमतीमध्ये फेरबदल करण्याचे हक्क राखून ठेवते. AI क्रेडिटचा वापर हा फक्त वेळोवेळी Google द्वारे उपलब्ध करून दिलेली ठरावीक AI वैशिष्‍ट्ये अ‍ॅक्सेस करण्यासाठी केला जाऊ शकतो.

तुम्ही AI क्रेडिट मिळल्यानंतर, निश्चित केल्याप्रमाणे, एका विशिष्ट कालावधीनंतर एक्स्पायर होऊ शकतात.

या अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय, AI क्रेडिटवर तुमचा कोणताही अधिकार किंवा हक्क नाही. तुम्ही दुसऱ्या वापरकर्त्याला किंवा खात्याला AI क्रेडिट विकू शकत नाही अथवा ट्रान्सफर करू शकत नाही किंवा AI क्रेडिट विकण्याचा किंवा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. तुम्ही AI क्रेडिट खरेदी करता, तेव्हा डिझाइन केलेल्या ठरावीक AI वैशिष्‍ट्यांसाठी तुम्ही प्री-पे करता. AI क्रेडिट ही डिजिटल चलन, सुरक्षा, कमॉडिटी किंवा इतर कोणत्याही प्रकारची आर्थिक दस्तऐवज नाहीत आणि कोणत्याही रोख मूल्यासाठी रिडीम करण्यायोग्य नाहीत. AI क्रेडिट ही फक्त Google च्या व्यवस्थेमध्ये नमूद केलेल्या AI वैशिष्‍ट्यांमध्ये रिडीम करण्यायोग्य आहेत. तुमचा Google One प्लॅन समाप्त झाल्यावर किंवा रद्द केल्यावर, कोणत्याही लागू असलेल्या परतावा धोरणाच्या अधीन राहून, कोणतीही न वापरलेली AI क्रेडिट गमवू शकतात.

AI क्रेडिटबद्दलइथे अधिक जाणून घ्या.

२. खरेदी आणि पेमेंट

Google One सदस्यत्वे अनिश्चित कालावधीसाठी आहेत आणि तुम्ही सदस्यत्व रद्द न केल्यास, तुमच्या सदस्यत्व अटींनुसार (उदाहरणार्थ, मासिक, वार्षिक किंवा इतर कालावधी) प्रत्येक बिलिंग चक्राच्या सुरुवातीला तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल.

तुम्ही Google One सदस्यत्व किंवा AI क्रेडिट खरेदी करता, तेव्हा तुमची खरेदी विक्रेत्याकडून वेगळ्या अटींच्या अधीन असेल. उदाहरणार्थ, तुम्ही Google One सदस्यत्वासाठी साइन अप करता किंवा Google Play Store द्वारे AI क्रेडिट खरेदी करता, तेव्हा तुमची खरेदी Google Play सेवा अटी यांच्या अधीन असेल.

Google Play Store द्वारे तुमच्या Google One सदस्यत्व किंवा AI क्रेडिटच्या खरेदीसाठी विक्रेता आहे:

  • युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील ग्राहकांसाठी: Google Commerce Limited
  • भारतातील ग्राहकांसाठी: Google Ireland Limited
  • आशिया, पॅसिफिकमधील उर्वरित ग्राहकांसाठी: Google Digital Inc.
  • युनायटेड स्टेट्स आणि उर्वरित जगातील ग्राहकांसाठी: Google LLC.

तुम्ही तृतीय पक्ष किंवा सहयोगी द्वारे Google One सदस्यत्व किंवा AI क्रेडिट खरेदी करता, तेव्हा ते तृतीय पक्ष किंवा सहयोगी तुमच्या पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारेल आणि तुमच्या पेमेंटमधील कोणत्याही समस्या व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असेल, ज्यामध्ये रद्द करणे आणि परतावा यांचा समावेश आहे.

विक्रेता तुमच्याकडून Google One सदस्यत्वाचे शुल्क आकारू शकत नसल्यास, तुम्ही विक्रेत्यासोबत तुमची पेमेंट पद्धत अपडेट करेपर्यंत तुम्हाला Google One अ‍ॅक्सेस करता येणार नाही. त्या सूचनेनंतर तुम्ही वाजवी वेळेत तुमची पेमेंट पद्धत अपडेट न केल्यास, आम्ही तुमचा Google One चा अ‍ॅक्सेस रद्द किंवा निलंबित करू शकतो.

३. किंमत आणि ऑफर

ऑफर. आम्ही वेळोवेळी Google One सदस्यत्वासाठी कोणत्याही शुल्काशिवाय चाचण्या देऊ शकतो. तुम्ही Google One चे सदस्यत्व खरेदी केले आहे, ज्यामध्ये चाचणीचा समावेश असल्यास, तुम्हाला चाचणी कालावधीसाठी Google One चा अ‍ॅक्सेस मिळेल. चाचणी कालावधीच्या शेवटी आणि लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत, तुम्ही विक्रेत्याला योग्य पेमेंट पद्धत दिली असल्यास, प्रत्येक बिलिंग कालावधीमध्ये तुमच्याकडून सदस्यत्वाची किंमत आपोआप आकारली जाईल आणि तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द करेपर्यंत शुल्क आकारले जाईल. कोणतेही शुल्क टाळण्यासाठी, चाचणी कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही विक्रेत्याकडून तुमचे सदस्यत्व रद्द करणे आवश्यक आहे. आम्ही वेळोवेळी Google One च्या सदस्यतांवर सूटदेखील देऊ शकतो. या ऑफरवर पात्रता निकषांसह अतिरिक्त अटी आणि नियम लागू होऊ शकतात व अशा कोणत्याही अतिरिक्त अटी तुम्हाला रिडेंप्शन किंवा खरेदी करण्यापूर्वी उपलब्ध करून दिल्या जातील. लागू कायद्याने प्रतिबंधित किंवा निर्बंध लागू केले असतील तिथे ही ऑफर लागू होणार नाही.

किंमतीमध्ये बदल. आम्ही वेळोवेळी Google One सदस्यत्वे किंवा AI क्रेडिटच्या किमती बदलू शकतो, उदाहरणार्थ, महागाई, लागू करांमध्ये बदल, प्रमोशनपर ऑफरबदल, Google One मधील बदल किंवा व्यवसायाच्या गरजा बदलणे. Google One सदस्यत्वांच्या किमतीतील बदलांसाठी, हे बदल तुमचा सध्याचा पेमेंट कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि सूचना दिल्यानंतर तुमच्याकडून पुढील पेमेंट देय झाल्यानंतर लागू होतील. तुमच्याकडून शुल्क आकारले जाण्याच्या किमान ३० दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला वाढलेल्या किमतीबाबत आगाऊ नोटिस देऊ. तुम्‍हाला ३० हून कमी दिवसांची आगाऊ नोटिस दिली गेल्‍यास, बदललेली किंमत ही पुढील पेमेंटवर लागू केली जाणार नाही. ती त्यानंतरच्या पेमेंटवर लागू केली जाईल. तुम्हाला नवीन किमतीत तुमचे Google One सदस्यत्व सुरू ठेवायचे नसल्यास, या अटींच्या रद्द करण्याच्या विभागात वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही सदस्यत्व रद्द करू शकता आणि तुम्ही आम्हाला सद्य बिलिंग कालावधी समाप्त होण्यापूर्वी सूचित केले असेल, तरच सदस्यत्वासाठी तुम्हाला यापुढे रक्कम आकारली जाणार नाही. जिथे किंमत वाढते आणि संमती घेणे आवश्यक असते, तेथे तुम्ही नवीन किमतीला सहमती दर्शवत नाही तोपर्यंत, तुमचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.

४. रद्द करणे आणि परतावे

रद्द करणे आणि मागे घेणे. तुम्हाला तात्काळ रद्द करण्याचा अधिकार नाही किंवा मदत केंद्र मध्ये आणखी वर्णन केल्याप्रमाणे रद्द करण्याचे किंवा मागे घेण्याचे इतर अधिकार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचे सदस्यत्व रद्द केल्यास, तुमच्या सध्याच्या बिलिंग कालावधीच्या उर्वरित कालावधीसाठी तुम्हाला Google One चा अ‍ॅक्सेस राहील. तुम्हाला मागे घेण्याचा अधिकार असल्यास आणि तो वापरायचा असल्यास, तुम्ही ज्या विक्रेत्याकडून खरेदी केली आहे त्यांना स्पष्ट विधानाद्वारे मागे घेण्याचा तुमचा निर्णय कळवणे आवश्यक आहे. तुम्ही मागे घेण्याच्या कालावधीदरम्यान सेवांचा परफॉर्मन्स सुरू करण्याची विनंती केल्यास, तुम्ही विक्रेत्याला करारामधून माघार घेण्याबाबत माहिती देईपर्यंत तुम्हाला दिलेल्या सेवांच्या प्रमाणात यथाप्रमाण रकमेचे पेमेंट करावे लागू शकते.

तुम्ही सेवा हटवणे यामार्फत Google One हटवण्याचा निर्णय घेतल्यास,तुम्‍ही सहमती दर्शवता, की तुम्ही Google One सेवांचा अ‍ॅक्सेस तात्काळ गमवू शकता. तुम्हाला तुमच्या बिलिंग कालावधीच्या उर्वरित कालावधीसाठी Google One सेवा कायम ठेवायच्या असल्यास, कृपया Google One हटवण्याऐवजी तुमचे सदस्यत्व रद्द करणे हे करा.

परतावे. तुम्ही Google One सदस्यत्व किंवा AI क्रेडिट खरेदी केले असल्यास, परतावा धोरण लागू होईल. परतव्याची विनंती करण्यासाठी तुम्ही ज्या विक्रेत्याकडून खरेदी केली आहे त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. तुमच्याकडे लागू कायद्याच्या अंतर्गत ग्राहकांचे अधिकार असू शकतात जे कराराद्वारे मर्यादित केले जाऊ शकत नाहीत. या अटी त्या अधिकारांना प्रतिबंधित करत नाहीत.

५. ग्राहक सपोर्ट

Google One मध्ये काही विशिष्ट Google सेवांवर ग्राहक सपोर्टचा अ‍ॅक्सेस असू शकतो. ग्राहक सपोर्ट तुमच्या विनंतीबाबत मदत करू शकत नसल्यास, आम्ही तुम्हाला लागू असलेल्या Google सेवेच्या ग्राहक सपोर्ट सेवेकडे ट्रान्सफर किंवा रीडिरेक्ट करू शकतो. तुमचे Google One सदस्यत्व रद्द किंवा निलंबित केले गेले असल्यास, ग्राहक सपोर्टसंबंधित निराकरण न झालेल्या तुमच्या समस्यादेखील निलंबित केल्या जाऊ शकतात आणि तुमचे सदस्यत्व तुम्ही रिस्टोअर केल्यानंतर तुम्हाला नवीन चौकशी सबमिट करावी लागू शकते. कृपया ग्राहक सपोर्टसंबंधित अधिक माहितीसाठी आमच्‍या मदत केंद्र ला भेट द्या.

६. कुटुंब शेअरिंग

तुमच्या Google One सदस्यत्वामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंब गटासोबत काही फायदे शेअर करता येतील.(“कुटुंब शेअरिंग”). तुम्हाला तुमच्या कुटुंब गटासोबत कोणतेही फायदे शेअर करायचे नसल्यास, तुम्ही Google One साठी कुटुंब शेअरिंग बंद करणे किंवा तुमचा कुटुंब गट सोडणे आवश्यक आहे. फक्त Google One प्लॅन व्यवस्थापक हे Google One सदस्यत्वामध्ये कुटुंबातील सदस्यांना जोडू शकतात आणि त्यावर कुटुंब शेअरिंग सुरू किंवा बंद करू शकतात. कुटुंब शेअरिंगबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या मदत केंद्र ला भेट द्या.

तुम्ही Google One वरील कुटुंब गटाचा भाग असल्यास, तुमच्या कुटुंब गटातील सदस्य तुमच्याबद्दल काही माहिती पाहू शकतील. उदाहरणार्थ, तुम्ही Google One कुटुंब शेअरिंग सुरू केलेल्या कुटुंब गटामध्ये सामील झाल्यास, कुटुंब गटातील इतर सदस्य (आणि आमंत्रितांना) तुमचे नाव, फोटो, ईमेल अ‍ॅड्रेस, तुम्ही बॅकअप घेतलेली डिव्हाइस, वापरलेले AI क्रेडिट आणि तुम्ही वापरत असलेल्या स्टोरेज जागेचे प्रमाण पाहू शकतात. Google One सदस्यत्वामध्ये समाविष्ट असलेले काही अतिरिक्त फायदे कुटुंबातील सदस्याने रिडीम केले आहेत का, कुटुंब गटातील सदस्य हेदेखील पाहू शकतात.

तुम्ही तुमच्या कुटुंब गटामध्ये Google One प्लॅन व्यवस्थापक असल्यास आणि तुम्ही कुटुंब शेअरिंग बंद केल्यास किंवा तुमचा कुटुंब गट सोडल्यास, तुमच्या कुटुंब गटाचे इतर सदस्य Google One सदस्यत्वाचा अ‍ॅक्सेस गमवतील. तुम्हाला तुमच्या Google One प्लॅन व्यवस्थापकाने कुटुंब शेअरिंग मधून Google One चा अ‍ॅक्सेस दिला असल्यास, तुम्ही तुमचा कुटुंब गट सोडल्यास किंवा तुमच्या Google One प्लॅन व्यवस्थापकाने कुटुंब शेअरिंग बंद केल्यास अथवा कुटुंब गट सोडल्यास, तुम्ही Google One चा अ‍ॅक्सेस गमवाल.

७. मोबाइल बॅकअप आणि रिस्टोअर

Google One हे तुम्हाला पात्र मोबाइल डिव्हाइस आणि मोबाइल प्लॅनसाठी वर्धित केलेला डेटा बॅकअप व रिस्टोअर ("बॅकअप आणि रिस्टोअर") कार्यक्षमता पुरवू शकते. बॅकअप आणि रिस्टोअर वापरण्यासाठी Google Photos आणि Android Messages यांसारखी अतिरिक्त अ‍ॅप्लिकेशन इंस्टॉल करणे आणि ती अ‍ॅक्टिव्ह करणे आवश्यक असू शकते. तुम्ही Google One अ‍ॅपमध्ये बॅकअप आणि रिस्टोअर संबंधित तुमचे पर्याय कधीही बदलू शकता. तुमचे Google One सदस्यत्व हे निलंबित किंवा रद्द केले गेल्यास, Android बॅकअप धोरणांनुसार, ठरावीक कालावधीनंतर तुम्ही बॅकअप आणि रिस्टोअर मध्ये सेव्ह केलेल्या डेटाचा अ‍ॅक्सेस गमावू शकता.